लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी): कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार, १ ऑगस्ट रोजी मराठी विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी केली. 

दोन्ही महान पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. निलेश देगावकर यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर तसेच त्यांच्या विपुल साहित्यावर सविस्तर प्रकाश टाकला. 

लेखन प्रेरणा दिन उपक्रम या विशेष दिनाचे औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लेखन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या अजरामर साहित्याचे सामूहिक वाचन व लेखन करून त्यांना आदरांजली वाहिली.

या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रफीउल्लाह खान आणि डॉ. सुभाष जिते यांची प्रमुख उपस्थिती होती तर महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रमेश देवडे यांनी तर आभार प्रा. शांतीलाल गायकवाड यांनी मानले.